top of page
Search

फ्युचर्स आणि ऑप्शन्स (FnO) ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कोणी करावे? ​

फ्युचर्स आणि ऑप्शन्स (FnO) अर्थात डेरिव्हेटिव्हस मार्केट हे एक हेजिंगसाठी तयार केलेले मार्केट आहे. हे मार्केट प्रामुख्याने मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी असते. मोठे इन्व्हेस्टर्स म्हणजेच ज्यांच्याकडे शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ आहे असे गुंतवणूकदार! फ्युचर्स चा एक लॉट हा सुमारे पाच ते दहा लाख रुपयांहुन अधिक किमतीचा असतो. म्हणजेच या सेगमेंटमध्ये काम करण्यासाठी आपल्याजवळ पाच ते दहा लाख रुपयांचे एकाच कंपनीचे शेअर्स असले पाहिजेत. तुमचा पोर्टफोलिओ जर याहुन कमी असेल तर तुम्ही फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केटमध्ये काम करणे टाळले पाहिजे. कारण या मार्केटमध्ये लहान गुंतवणूकदारांचे कायम नुकसान होते हा इतिहास आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केटबद्दल सविस्तर ट्रेनिंग आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमधील "गोल्ड लेव्हल"मध्ये दिलेले आहे. तुमचा पोर्टफोलिओ जर मोठ्या आकाराचा असेल तर तुम्ही FnO सेगमेंटबद्दल सविस्तर ट्रेनिंग घेऊ शकता आणि यामध्ये काम करु शकता.


लोकांना असे वाटते की ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करुयात आणि एका दिवसात दहा हजाराचे एक लाख करुयात. परंतु ऑप्शन्समध्ये अश्या प्रकारचे काम कधीच करायचे नसते. ऑप्शन्समध्ये काम करताना कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज्‌ स्ट्रेटेजीज्‌ वापरायच्या असतात. या कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजीज्‌ कश्या प्रकारे वापरतात हे समजावे म्हणून नुकताच आपल्या गुंतवणूक कट्ट्यावर एक सेशन घेण्यात आला.


पुढील लिंकवर तुम्हाला या सेशनचे रेकॉर्डिंग बघता येईल - https://www.guntavnook.com/option-strategies
51 views0 comments

Comments


bottom of page