*DISCLAIMER*
-
गुंतवणूक कट्टा उपक्रमाद्वारे सोशल मीडिया, तसेच इंटरनेटवर प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओज् व कोर्सेस हे पूर्णतः शैक्षणिक स्वरुपाचे आहेत. गुंतवणूक कट्ट्याद्वारे प्रसारित केल्या जाणार्या कोणत्याही साहित्याद्वारे कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही.
-
"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" किंवा आमचे इतर कोर्सेस हे व्हिडिओज्चे संग्रह आहेत. तुम्ही भरत असलेल्या फीच्या बदल्यात तुम्हाला हे व्हिडिओज् बघण्याची मुभा (परवानगी) मिळते.
-
"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" किंवा आमचे इतर कोर्सेस ही कोणत्याही प्रकारची "पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम", किंवा "अॅडव्हायजरी सर्व्हिस" म्हणजेच "गुंतवणुकीचा सल्ला देणारी व्यवस्था" नाही.
-
"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्टमेंट्स" या व्यक्ती/संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम व्हिडिओच्या प्रेक्षकांकडुन घेत नाही.
-
"पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" किंवा आमचे इतर कोर्सेस या व्हिडिओ संग्रहांमध्ये कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन दिले जात नाही.
-
आमच्या व्हिडिओज् मध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स दिल्या जात नाहीत, तसेच कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. या व्हिडिओज् मध्ये गुंतवणूक या विषयाबद्दल प्रबोधनपर असा मजकूर शेअर केला जातो.
-
सदर व्हिडिओज् हे "INFOTAINMENT" या प्रकारामधील आहेत. हे व्हिडिओज् बघुन प्रेक्षकांनी गुंतवणूक या विषयाबद्दल स्वतःचे प्रबोधन करुन घेणे अपेक्षित आहे
-
कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी प्रेक्षकांनी आपापल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करणे उचित आहे.
-
हे व्हिडिओज् बघुन तुम्ही घेतलेल्या निर्णयाद्वारे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी "नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील.
-
शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स इत्यादी गुंतवणूक पर्याय हे बाजार जोखिमेच्या अधीन आहेत. कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर यामधील जोखीम व्यवस्थित समजुन घेणे व सारासार विचार करणे अपेक्षित आहे. तसेच आवश्यक असल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"शी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
-
"नीरज बोरगांवकर", "बोरगांवकर इन्व्हेस्ट्मेंट्स" या व्यक्ती वा संस्था "सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार" नाहीत.
-
"Neeraj Borgaonkar", "Borgaonkar Investments" are NOT registered with SEBI as Investment Advisor
-
आम्ही गुंतवणूक या विषयाचे अभ्यासक आहोत. आमच्या बुद्धीनुसार आम्ही या विषयाचा अभ्यास करीत असतो. आमचा अभ्यास चुकीचा देखील असु शकतो. आमचा कोणताही व्हिडिओ बघुन कुठलाही आर्थिक निर्णय घेण्याआधी सारासार विचार करणे, तसेच आवश्यक वाटल्यास "सेबी नोंदणीकृत सल्लागारा"चा सल्ला घेणे अपेक्षित आहे.
-
तुम्ही "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" या व्हिडीओ संग्रहासाठी किंवा आमच्या कोणत्याही इतर कोर्ससाठी भरत असलेली फी ही आमच्या "पेड कंटेंट" चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे "नॉन रिफंडेबल" अर्थात "परत न करण्य़ायोग्य" आहे याची नोंद घ्यावी.
-
गुंतवणूक कट्टा अभ्यासक्रमात काही थर्ड पार्टी साधने किंवा प्लॅटफॉर्म वापरले जातात. या प्लॅटफॉर्मच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात आणि त्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर आधारित साधने कधी उपलब्ध राहतील किंवा बंद होतील, याची खात्री देता येत नाही. म्हणूनच, अशा साधनांच्या सातत्यपूर्ण उपलब्धतेची हमी आम्ही देऊ शकत नाही.
-
पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये आणि गुंतवणूक कट्टा उपक्रमामधील कोणत्याही कोर्स अथवा कंटेंटमध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार "नीरज विजय बोरगांवकर" यांच्याकडे राखीव आहेत.
-
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) टूल संबंधी - गुंतवणूक कट्टा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेणे सोपे जावे याकरिता आपण एका थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मची मदत घेऊन AI अर्थात आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा समावेश केलेला आहे. गुंतवणूक कट्टा उपक्रमामध्ये समाविष्ट केलेले AI टूल हे थर्ड पार्टी API वर आधारित असून, त्याच्या कार्यप्रणालीतील बदलांवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. हे टूल स्वयंचलितपणे प्रतिसाद निर्माण करते आणि हे प्रतिसाद फक्त ज्ञान व शैक्षणिक उद्देशांसाठी वापरण्यासाठी आहेत. जसे की AI टूलच्या वापराच्या पृष्ठावर स्पष्टपणे नमूद केले आहे, AI कधी कधी चुकीची, अपूर्ण किंवा संदर्भहीन माहिती प्रदान करू शकते. त्यामुळे या प्रतिसादांवर पूर्ण विश्वास ठेवू नये किंवा कोणतेही आर्थिक, गुंतवणुकीचे किंवा अन्य महत्त्वाचे निर्णय केवळ AI च्या उत्तरांवर आधारित घेऊ नयेत. AI द्वारे दिलेल्या कोणत्याही माहितीची स्वतः पडताळणी करणे गरजेचे आहे. गुंतवणूक, व्यापार किंवा कोणत्याही वित्तीय निर्णयांपूर्वी सखोल अभ्यास करून, विश्वसनीय स्रोत तपासून आणि तज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. AI टूलमधील तांत्रिक बदल, अपग्रेड किंवा सेवा व्यत्यय यामुळे त्याच्या उपलब्धतेत किंवा कार्यक्षमतेत बदल होऊ शकतो, याचीही नोंद घ्यावी. यामुळे, AI टूलद्वारे दिलेल्या माहितीच्या अचूकतेची, सातत्यपूर्ण उपलब्धतेची किंवा विश्वसनीयतेची कोणतीही हमी आम्ही देऊ शकत नाही. वापरकर्त्याने मिळालेल्या उत्तरांचा योग्य प्रकारे उपयोग करावा आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकारावा. वापरकर्त्यांनी AI टूलला जबाबदारीने आणि योग्य प्रकारे प्रश्न विचारावेत. हे टूल फक्त शिक्षण आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी आहे, हे टूल गुंतवणूक सल्ला, स्टॉक निवड, ट्रेडिंग टिप्स किंवा कोणत्याही प्रकारच्या सल्लागार सेवांसाठी तयार केलेले नसून प्रशिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता तयार केलेले आहे. AI कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ शकत नाही तर ते त्याच्याकडे अगोदर पुरवलेल्या माहितीचे विश्लेषण करून सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचे कार्य करू शकते. त्यामुळे, गुंतवणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेताना अधिकृत तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-
कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी connect@guntavnook.com