top of page

"स्टॉक स्ट्रॅटेजीज्‌" एज्युकेशनल टेलिग्राम चॅनल

शेअर मार्केटमध्ये "पोझिशनल ट्रेडिंग" आणि "इंट्राडे ट्रेडिंग" करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. "स्टॉक स्ट्रॅटेजीज्‌" हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला या वेगवेगळ्या पद्धती शिकता याव्यात यासाठी तयार केलेला आहे. या चॅनलवर कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा गुंतवणुकीचे सल्ले दिले जात नाहीत, तर हा एक पूर्णपणे शैक्षणिक उपक्रम आहे.

या चॅनलवर आपण ज्या ज्या ट्रेडिंग पद्धतींची माहिती घेणार आहोत त्या पद्धतीच्या नियमांमध्ये बसणार स्टॉक्स रिअल टाईम पोस्ट होतील अशी सिस्टीम आपण विकसित केलेली आहे. (हे अपडेट्स म्हणजे कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नसुन एज्युकेशनल पर्पजसाठी दिली जाणारी उदाहरणे आहेत याची नोंद घ्यावी.) ही उदाहरणे बघुन आपल्याला रिअल टाईम मार्केटमध्ये या पद्धती कश्या काम करतात याचा अनुभव मिळणे हे या टेलिग्राम चॅनलचे उद्दीष्ट आहे.

या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंगचे निर्णय घेण्याआधी विषय नीट समजुन घेणे, स्टॉप लॉसच्या नियमांचे पालन करणे, तसेच आवश्यक असल्यास आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे उचित आहे याची नोंद घ्यावी.

आपल्या चॅनलवरील अपडेट्स बघुन कोणताही आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे आवश्यक आहे. तुम्हाला होणार्‍या कोणत्याही नफ्याची अथवा नुकसानाची जबाबदारी या टेलिग्राम चॅनलच्या संचालकांवर नाही.

या चॅनलवर पोस्ट होणार्‍या सर्व गोष्टी व्यवस्थित बघा आणि नवनविन स्ट्रॅटेजीज्‌ आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

ऑल द बेस्ट!

bottom of page