top of page
Search

पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय?

शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग होत असते. या शेअर्सचे भाव वरखाली होत असतात. एखाद्या शेअरचा भाव येत्या काही दिवसांमध्ये वाढेल असा जर आपला अंदाज असेल तर आपण तो शेअर खरेदी करु शकतो आणि भाव वाढल्यानंतर लगेच तो शेअर विकून टाकू शकतो. अश्या पद्धतीच्या ट्रेडिंगला "पोझिशनल ट्रेडिंग" असे म्हणले जाते. यालाच "मोमेंटम ट्रेडिंग" किंवा "स्विंग ट्रेडिंग" हीदेखील नावे वापरली जातात. अश्या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्सची डिलिव्हरी घेतली जाते आणि सुमारे काही आठवडे किंवा काही महिने या कालावधीसाठी हे शेअर्स होल्ड केले जातात.


पोझिशनल ट्रेडिंग हा एक व्यापार आहे. आणि हा व्यापार करण्याचे एक शास्त्र आहे. यासाठी पुढील मुद्द्यांचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे -


1 - कोणत्या शेअरचा भाव येत्या काळात वाढू शकतो?

2 - असा शेअर आपल्याला सापडला तर त्या शेअरमध्ये नेमके किती पैसे इन्व्हेस्ट करावेत?

3 - शेअरचा भाव किती वाढल्यानंतर प्रॉफिट बूक करावा?

4 - समजा आपला अंदाज चुकला आणि शेअरचा भाव वर न जाता खाली घसरु लागला तर काय करावे?


या मुद्द्यांचा व्यवस्थित विचार केला आणि यानुसार एक स्ट्रॅटेजी बनवून काम केले तर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये प्रचंड मोठी अशी संधी आहे. "गुंतवणूक कट्टा" या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करण्याच्या विविध पद्धतींचे सविस्तर प्रशिक्षण सोप्या मराठी भाषेमध्ये घेता येते. या उपक्रमाची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका फ्री वेबिनारचे आयोजन केले आहे. सुमारे सव्वा ते दीड तासाच्या या वेबिनारमध्ये तुम्हाला "गुंतवणूक कट्टा - PBP 3.0" या एका नाविन्यपूर्ण कोर्सची माहिती देण्यात येईल.


नाविन्यपूर्ण अश्यासाठी, की या कोर्समध्ये अश्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इतरत्र कुठेही मिळत नाहीत. उदाहरणार्थ यात तुम्हाला काही स्पेशल इंडिकेटर्स मिळतात, काही स्पेशल टूल्स मिळतात. या टूल्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ट्रेडिंगसाठी करता येतो. शेअर मार्केट या विषयामध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि सोप्या मराठी भाषेमधून शिकायचे असेल तर आपला स्पेशल वेबिनार अजिबात चुकवू नका.


वेबिनार रजिस्ट्रेशनसाठी पुढील लिंक ओपन करा आणि तुमचा ईमेल आयडी लिहा, म्हणजे वेबिनारची वेळ आणि युनिक जॉईनिंग लिंक तुम्हाला ईमेलवर मिळेल.


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar

24 views0 comments
bottom of page