top of page
Search

गुंतवणूक कट्टा मार्केट अपडेट 3MAR22


दिनांक - 3 मार्च 2022


निफ्टी - 16,498.05 (-107.90)

सेन्सेक्स - 55,102.68 (-366.22)

बॅंकनिफ्टी - 34944.30 (-428.50)

गोल्ड - 52810

यु एस डॉलर - 76.01


निफ्टीमधील टॉप गेनर्स - ONGC , UPL , POWERGRID , WIPRO , TECHM


निफ्टीमधील टॉप लूझर्स - ULTRACEMCO , ASIANPAINT , HDFCLIFE , SHREECEM , EICHERMOT


आज 3 मार्च रोजी वीकली एक्स्पायरी होती. आजचा दिवस ट्रेडर्सना चकवणारा दिवस ठरला. सकाळी मार्केट (निफ्टी) 110 पॉईंट्स गॅप अप ओपन झाले. आणि लॉंग ट्रेडर्सना चकवत बाजार खाली पडू लागला. ही घसरण दीड वाजेपर्यंत सुरु राहिली आणि त्यानंतर बाजारामध्ये थोडीशी रिकव्हरी दिसून आली. परंतु ही रिकव्हरीदेखील टिकू शकली नाही आणि बाजारा पुन्हा खाली आला व 16508 या लेव्हलवर बंद झाला. एक्स्पायरीच्या दिवशी ऑप्शन्स प्रिमियम कमी झालेली असतात. एक्स्पायरीच्या दिवशी थोडेसे रिस्क घेऊन काम केले तर मोठे रिटर्न्स मिळवण्याची संधी उपलब्ध असते.


एक उदाहरण देऊन समजावून सांगतो. सकाळी बाजार गॅप अप ओपन झाला. सकाळी सव्वानऊ वाजता निफ्टीची किंमत 16750 च्या आसपास होती. अश्या वेळी बाजार वर जाईल की खाली जाईल हे स्पष्ट नसते. अश्या वेळी आपण "लॉंग स्ट्रॅंगल" नावाची एक स्ट्रॅटेजी वापरु शकतो. म्हणजे 16900 चा कॉल ऑप्शन 20 रुपयांना विकत घेणे आणि 16600 चा पुट ऑप्शन 30 रुपयांना विकत घेणे. म्हणजे आपली एकूण रिस्क झाली 20+30 = 50 रुपये. एका लॉटमध्ये जर आपण हे काम करीत असू तर आपल्याला लागतील 2500 रुपये. म्हणजेच आपली एकूण रिस्क एका लॉटमागे 2500 रुपये आहे. दिवसभरातील ट्रेडिंग जर बघितले, तर 16600 च्या पुटची किंमत 3:10PM वाजता 145 रुपये झालेली होती. इथे आपल्या लॉंग पुट ऑप्शनची किंमत झाली 7250. आणि मार्केट सतत खाली पडल्यामुळे आपल्या 16900 च्या कॉल ऑप्शनची किंमत शून्य झाली. म्हणजेच आपल्या एकूण 2500 रुपयांच्या रिस्कच्या बदल्यात आपल्याला 7250 रुपयांचा प्रॉफिट मिळवण्याची संधी होती. या स्ट्रॅटेजीची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे, की जर मार्केट खाली न पडता वर वर गेले असते तरीदेखील आपल्याला असाच प्रॉफिट आपल्या कॉल ऑप्शनमध्ये झाला असता. अश्या प्रकारची स्ट्रॅटेजी शक्यतो एक्स्पायरीच्या दिवशी केली जाते आणि चा सक्सेस रेट अतिशय चांगला आहे. कारण एक्स्पायरीच्या दिवशी बाजारामध्ये एक मोठी मूव्हमेंट घडत असते.


अश्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉजिक नीट लक्षात घेऊन काम केले तर आपली रिस्क कंट्रोलमध्ये ठेवता येते आणि चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स मिळवता येतात. ऑप्शन स्ट्रॅटेजी शिकणे अतिशय सोपे आहे. आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या गोल्ड लेव्हलमध्ये अश्या अकरा वेगवेगळ्या ऑप्शन स्ट्रॅटेजीज्‌ सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवलेल्या आहेत.


शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्यवसाय करणे हे एक शास्त्र आहे. आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळते. या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपला वेबिनार नक्की अटेंड करा. (संधी किती काळ राहील हे सांगता येत नाही!)


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar



(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)

32 views0 comments
bottom of page