top of page
Search

"एसआयपी" जगामधील नववे आश्चर्य!

गुंतवणूक या विषयाबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा एसआयपी अर्थात "सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन"चा उल्लेख झाला नाही असे कधीच होत नाही. कम्पॉउंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे असे म्हणतात. यापुढे जाऊन मला असे म्हणायला आवडेल, की एसआयपी हे जगामधील नववे आश्चर्य आहे. सर्वप्रथम एसआयपी म्हणजे काय हे समजून घेउयात. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांमधील भाव हे सतत वरखाली होत असतात. तुम्ही कल्पना करा, की जर तुम्हाला शेअर बाजार जेव्हा जेव्हा स्वस्त असेल तेव्हा तेव्हा जर आपोआप तुम्हाला त्या परिस्थितीचा फायदा मिळाला तर किती छान होईल? सोप्या भाषेमध्ये शेअर बाजारामधील अनुकूल परिस्थितीचा फायदा मिळवण्याची पद्धत म्हणजे एसआयपी होय!

एसआयपीची कार्यपद्धती कशी चालते हे समजून घेउयात. यामध्ये एखाद्या शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये दरमहा तुमची ठराविक रक्कम गुंतवली जाईल अशी व्यवस्था करुन दिली जाते.


एक उदाहरण बघुयात -समजा तुम्ही अबक या फंडामध्ये दरमहा शंभर रुपयांची एसआयपी लावलीत तर दरमहा ठरलेल्या तारखेला या फंडामध्ये तुमचे शंभर रुपये आपोआप गुंतवले जातात. आता अबक या फंडाची किंमत (NAV) ही बाजाराच्या चढ-उतारांनुसार सतत बदलत असते. समजा पहिल्या महिन्यामध्ये ही NAV किंमत 10 रुपये असेल, तर तुमची दहा युनिट्स खरेदी होतात. दुसर्‍या महिन्यामध्ये समजा बाजार खाली असेल आणि NAV खाली म्हणजे 5 रुपयांवर आली असेल तर तुमच्या शंभर रुपयांमध्ये दुप्पट म्हणजेच वीस युनिट्स खरेदी होतात. समजा तिसर्‍या महिन्यामध्ये बाजार महाग झाला आणि NAV समजा 20 रुपये झाली, तरीदेखील तुमची गुंतवणूक शंभर रुपयेच असल्यामुळे आता तुमची पाचच युनिट्स खरेदी होतील!


याचाच अर्थ बाजार जेव्हा स्वस्त असतो, तेव्हा तेव्हा आपोआप तुम्ही जास्त गुंतवणूक करता आणि बाजार जेव्हा महाग असतो तेव्हा आपोआप तुमची कमी रक्कम गुंतवली जाते. याच व्यवस्थेला मी जगामधील नववे आश्चर्य असे म्हणले आहे. म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या एसआयपीचे फार मोठे फायदे लोकांना मिळालेले आहेत. म्युच्युअल फंडांमध्ये केलेली एसआयपी ही सर्वोत्तम मानली जाते, कारण म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापन हे निष्णात फंड मॅनेजर्सद्वारे केले जात असते आणि ही सर्व व्यवस्था सेबी आणि अ‍ॅम्फी या संस्थांद्वारे प्रमाणित केलेली असते. तसेच आपण सर्व गोष्टी अतिशय पारदर्शक पद्धतीने पारखून घेऊन मगच आपली गुंतवणूक करु शकतो.


म्युच्युअल फंडांमधील तुमची गुंतवणूक सोपी व्हावी याकरिता गुंतवणूक कट्ट्याद्वारे "इन्व्हेस्टर" हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलेला आहे. हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी विनामूल्य आहे तसेच पूर्णतः ऑनलाईन आहे. म्हणजेच तुम्ही आत्ता लगेच तुमच्या घरामधून म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक सुरु करु शकता. ही गुंतवणूक अगदी कमीत कमी रकमेपासून म्हणजेच शंभर रुपयांपासून सुरु करता येते. इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्ममध्ये अकाऊंट काढणे अतिशय सोपे आहे. पुढील लिंकवर जाऊन "साईन अप" करा, तुमची प्रोफाईल भरुन पूर्ण करा. इथे व्हिडिओ केवायसी करण्याचीदेखील सोय आहे. हे झाले की लगेच तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक सुरु करु शकता. इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्मची लिंक - https://investor.guntavnook.com

(हा अ‍ॅम्फी व BSE Star MF मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म असून मान्यतेचे सर्व तपशील प्लॅटफॉर्मच्या होमपेजवर बघायला मिळतील.)


या प्लॅटफॉर्मवर काम करताना कोणतीही अडचण आली तर आमचा ईमेल सपोर्ट उपलब्ध आहे. connect@guntavnook.com या ईमेल आयडीवर एक ईमेल पाठवा म्हणजे तुमची अडचण सोडवून दिली जाईल.



गुंतवणूक कट्ट्याबद्दल थोडेसे


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये शेअर मार्केट, गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स, फ्युचर्स ऑप्शन्स या विषयांचे प्रशिक्षण सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला घेता येते. गुंतवणूक कट्ट्याची माहिती तुम्हाला देण्याकरिता एका खास मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


डिस्क्लेमर -

म्युच्युअल फंड व शेअर बाजारामधील गुंतवणुकीमध्ये जोखीम समाविष्ट असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर योजनेसंबंधीची कागदपत्रे व तपशील पूर्ण समजून घ्यावा. तसेच आवश्यक वाटल्यास आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत अवश्य करावी.

489 views0 comments
bottom of page