top of page
Search

4 मार्च 2022 गुंतवणूक कट्टा मार्केट अपडेट
दिनांक - 4 मार्च 2022


निफ्टी - 16,245.35 (-252.70)

सेन्सेक्स - 54,333.81 (-768.87)

बॅंकनिफ्टी - 34,407.80 (-536.50)

गोल्ड - 53,150

यु एस डॉलर - 76.16


निफ्टीमधील टॉप गेनर्स - DRREDDY , ITC , TECHM , BPCL , UNLTRACEMCO


निफ्टीमधील टॉप लूझर्स - TITAN , MARUTI , ASIANPAINT , HEROMOTOCO , TATAMOTORS


आजचा दिवस हा संधीसाधू ट्रेडर्ससाठी अतिशय उत्तम असा दिवस होता. सध्या बाजारामधील एकूण वातावरण हे निगेटिव्ह झालेले आहे. रशिया युक्रेन वॉर, FII ची सातत्यपूर्वक सुरु असणारी विक्री, डॉलरसमोर घसरणारा रुपया या सर्व गोष्टींमुळे भारतीय शेअर बाजार खाली पडत आहे. परंतु अश्या काळामध्ये बाजार अतिशय व्होलटाईल असतो आणि या काळामध्ये ट्रेडर्ससाठी खूप सार्‍या संधी उपलब्ध असतात. सध्याचा एकूण पॅटर्न बघितला तर सध्या गॅप-अप आणि गॅप-डाऊन ओपन सतत बघायला मिळतात. कालच्या क्लोजपेक्षा समजा बाजार थोडासा वर उघडला तर त्याला "गॅप-अप" असे म्हणले जाते आणि कालच्या क्लोजिंगपेक्षा समजा बाजार खाली उघडला तर त्याला "गॅप-डाऊन" असे म्हणले जाते.


आज बाजार (निफ्टी) सुमारे दीडशे पॉईंट्स गॅप-डाऊन उघडला. व्होलटाईल मार्केटमध्ये एक "ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट" (ORB) नावाची स्ट्रॅटेजी वापरुन काम केले जाते. ORB स्ट्रॅटेजीमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर थोडा वेळ बाजार कोणत्या रेंजमध्ये ट्रेड करीत आहे हे बघितले जाते, आणि पुढील काही काळामध्ये जर बाजाराने ही रेंज तोडली तर ट्रेड घेतला जातो. आज सकाळी सव्वादहापर्यंत बाजार 16230 ते 16365 या रेंजमध्ये घुटमळत होता. पण नंतर त्याने खालच्या दिशेने रेंज तोडली. त्यामुळे ORB ट्रेडर्ससाठी निफ्टी शॉर्ट करुन सुमारे शंभर पॉईंट्स मिळवण्याची एक संधी निर्माण झाली.


सुमारे सव्वा अकरा वाजल्यानंतर बाजारामध्ये एक तेजी सुरु झाली. या तेजीमध्येदेखील ट्रेडर्ससाठी सुमारी तीनशे पॉईंट्स मिळवण्याची एक संधी बाजाराने दिली. शेवटच्या सत्रामध्ये बाजार पुन्हा मंदीमध्ये जाऊ लागला आणि शेवटी पुन्हा ओपनिंग प्राईजच्या जवळपास बंद झाला. अश्या प्रकारच्या मार्केटमध्ये आपण विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजीज्‌ वापरुन काम करु शकतो. आजच्यासारख्या बाजारामध्ये आपण ऑप्शन्समध्ये "शॉर्ट स्ट्रॅडल" ही स्ट्रॅटेजी वापरुन काम करु शकतो. शॉर्ट स्ट्रॅडलमध्ये एकाच स्ट्राईक प्राईजचे कॉल व पुट दोन्ही विकले जातात आणि नंतर ते कव्हर केले जातात. 16250 च्या स्ट्रॅडलची किंमत आज सकाळी 557 रुपये होती. बाजार बंद होताना हेच स्ट्रॅडल सुमारे 470 रुपयांवर आले होते. डोळे उघडे ठेवून वावरले आणि सर्व विषय नीट समजून घेतला तर शेअर बाजारामध्ये प्रचंड मोठी अशी संधी आहे. परंतु यासाठी आपल्याला या सर्व संकल्पना व्यवस्थित शिकून घ्याव्या लागतील.


शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्यवसाय करणे हे एक शास्त्र आहे. आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला मिळते. या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपला वेबिनार नक्की अटेंड करा. (संधी किती काळ राहील हे सांगता येत नाही!)


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)
12 views0 comments

Opmerkingen


bottom of page