शेअर मार्केटमध्ये दररोज हजारो कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार सुरु असतात. सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. दररोज या शेअर्सच्या भावांमध्ये चढ-उतार सुरु असतात. या शेअर बाजारामध्ये पैसे मिळवण्याच्या भरपूर संधी दडलेल्या आहेत. सामान्यतः शेअर बाजाराचा विषय निघाला की लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जातो. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स ओळखून ते शेअर्स खरेदी करुन ठेवायचे आणि पाच, दहा, पंधरा वर्षे ते शेअर्स आपल्या खात्यामध्ये होल्ड करायचे अश्या पद्धतीची ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये रिस्क थोडीशी कमी असते. परंतु त्यामुळे यामध्ये मिळू शकणारा रिटर्नदेखील मर्यादितच असतो. "हायर द रिस्क, हायर द रिटर्न" म्हणजेच तुम्ही जितका जास्त धोका पत्कराल तितका जास्त परतावा मिळणार हे कोणत्याही व्यवसायाचे तत्व आहे.
शेअर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक हा काम करण्याचा एक प्रकार आहे. याव्यतिरिक्तदेखील अनेक असे प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला अधिक परतावा मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये आपण आपल्या भांडवलावर वार्षिक पंधरा ते वीस टक्के परताव्याची अपेक्षा करु शकतो. परंतु आपल्याला जर यापेक्षा अधिक परतावा मिळण्याची इच्छा असेल तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे इतर पर्याय अभ्यासणे गरजेचे आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये कंपनीचा महसूल, निव्वळ नफा, बॅलन्स शीट, दर वर्षी नफ्यामध्ये किती वाढ होत आहे, पुढील काळामध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये कशी वाढ होऊ शकते, कंपनीचा व्यवसाय वाढीकरिता पूरक आहे का या आणि अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. आणि हा सर्व अभ्यास करुन गुंतवणुकीवर मिळत आलेला सरासरी परतावा हा पंधरा वीस टक्क्यांहून अधिक नसतो. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये "पेशन्स" ठेवावा लागतो. चांगले चांगले शेअर्स देखील बरेचदा अपेक्षित वाढ दाखवित नाहीत. अश्या वेळेस दीर्घकालीन गुंतवणूकदाराला शांतपणे बसून रहावे लागते. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे यामध्ये आपण एखादा शेअर शंभर रुपयांना खरेदी करतो, पुढील दोन तीन वर्षे तो अजिबात वाढत नाही, आपण कंटाळतो आणि हा शेअर आपल्या खरेदीच्या आसपासच्या किमतीला दोन तीन वर्षांमध्ये विकून टाकतो आणि आपण शेअर विकला रे विकला, की याच शेअरमध्ये जबरदस्त तेजी येते. आणि आपल्या वाट्याला येतो फक्त पश्चात्ताप!
दीर्घकालीन गुंतवणूक करु नये असे मी अजिबात म्हणत नाही. किंबहुना शेअर मार्केटमधील आपले फाऊंडेशन घट्ट करायचे असेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ही हवीच हवी. परंतु आपले सर्व पैसे हे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये ठेवून उपयोग होत नाही. आपल्याला आपल्या पैश्यांचे "अॅसेट अॅलोकेशन" करणे अत्यंत गरजेचे आहे. शेअर मार्केटमध्ये काम करण्याचा अजून एक उत्तम प्रकार आहे तो म्हणजे "स्विंग ट्रेडिंग". या स्विंग ट्रेडिंगला "पोझिशनल ट्रेडिंग", "मोमेंटम ट्रेडिंग" या नावांनीदेखील ओळखले जाते. या स्विंग ट्रेडिंगमध्ये शेअरच्या भावांमध्ये जे चढ-उतार होतात त्यांचा फायदा घेऊन काम केले जाते. तुम्ही कोणत्याही शेअरचा चार्ट काढून बघितलात तर तुम्हाला असे लक्षात येईल की हा भाव सतत वर-खाली होत असतो. शेअरच्या किमतीचे हे असे वर खाली होणे यालाच "स्विंग" म्हणजे "झोका" असे म्हणतात. शेअरचा भाव वर केव्हा जातो, आणि खाली केव्हा येतो याचा अभ्यास करुन ट्रेड्स घेतले जातात व प्रॉफिट बूक केला जातो. यालाच स्विंग ट्रेडिंग असे म्हणतात. सामान्यतः स्विंग ट्रेडिंगचा कालावधी हा एखाद-दोन आठवडे ते दोन तीन महिन्यांपर्यंत असतो. म्हणजेच समजा आज आपण शेअर्स खरेदी केले तर पुढील एक दोन आठवड्यांमध्ये किंवा जास्तीत जास्त दोन ती महिन्यांमध्ये हे शेअर्स विकून त्यामध्ये नफा बूक करणे अपेक्षित आहे. यशस्वी स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी पुढील तीन गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतात -
1 - येत्या काळामध्ये ज्या शेअर्सचा भाव वर जाऊ शकेल असे शेअर्स ओळखणे
2 - आपले पैसे गुंतवताना "पोझिशन साईझिंग" व "स्टॉप लॉस" या दोन नियमांचे पालन करणे
3 - आपल्या कामामध्ये शिस्त बाळगणे
पोझिशन साईझिंग आणि स्टॉप लॉस हा एक फार मोठा विषय आहे. स्विंग ट्रेडिंग करताना आपण कोणत्या शेअरमध्ये किती पैसे गुंतवतो, आणि आपला स्टॉप लॉस कसा मॅनेज करतो हा या स्विंग ट्रेडिंगमधील सर्वात कळीचा मुद्दा आहे. यशस्वीरित्या स्विंग ट्रेडिंग कसे करावे या विषयावर गुंतवणूक कट्ट्याद्वारे येत्या रविवारी एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे. या वेबिनारमध्ये स्विंग ट्रेडिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच स्विंग ट्रेडिंग कोणत्या शेअर्समध्ये करावे हे ओळखण्यासाठी एक स्पेशल इंडिकेटर तुम्हाला विनामूल्य देण्यात येईल व हा इंडिकेटर कसा वापरावा याचे विनामूल्य ट्रेनिंग देण्यात येईल.
या वेबिनारला उपस्थित राहण्याकरिता (विनामूल्य) रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. पुढील लिंकवरुन या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करता येईल - https://www.guntavnook.com/webinar
रजिस्ट्रेशन पूर्ण होताच वेबिनारची लिंक व्हॉट्सअॅप व ईमेलवर पाठवण्यात येईल.
Comments