top of page
Search

शेअर मार्केटमधून दिवसाला पाचशे रुपये कसे कमवावेत?

गेली अनेक वर्षे मी शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहे. "गुंतवणूक कट्टा" या माझ्या उपक्रमाच्या माध्यमातून मला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणार्‍या हजारो मराठी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. आजच्या लेखामध्ये आपण माझ्याकडे येणार्‍या एका कॉमन प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. मला बर्‍याच लोकांकडून हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे - "शेअर मार्केटमध्ये काम करुन दिवसाला पाचशे ते हजार रुपये कसे कमवावेत?"

सुरुवातीला आपण या प्रश्नाचा थोडासा खोलवर जाऊन विचार करुयात. असा प्रश्न मुळात लोकांच्या मनामध्ये का येतो? आपल्या देशामध्ये मध्यमवर्गीय नोकरदार हा अतिशय मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. हा मध्यमवर्ग सुमारे 15 हजार ते 35 हजार रुपयांच्या मासिक प्राप्तीसाठी महिनाभर प्रचंड कष्ट करीत असतो. नोकरी करीत असतो. या सर्व मध्यमवर्गीयाच्या मनामध्ये कुठेतरी आपल्या मासिक प्राप्तीइतके पैसे दरमहा कमी कष्टामध्ये मिळावेत ही एक सूप्त इच्छा असते. मग या इच्छेची पूर्ती करण्यासाठी चेन मार्केटिंग, प्रॉडक्ट सेलिंग, शेअर मार्केट असे विविध पर्याय त्याच्या डोळ्यासमोर येतात. मी स्वतःदेखील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वाढलेलो असल्यामुळे मी या सर्वांमधून गेलेलो आहे. या प्रश्न लोकांच्या मनामध्ये येण्यामागील मुख्य कारण हे पैसे मिळवणे हे नसून "मला या नोकरीच्या कटकटीमधून सुटका मिळेल का?" हे असते.


मध्यमवर्गीयांमध्ये हा प्रश्न अतिशय ज्वलंत असल्यामुळे काही फसव्या स्कीम्स सातत्यपूर्वक बाजारामध्ये येत असतात. या स्कीम्समध्ये असे वायदे केले जातात की अमुक सर्व्हिस घ्या आणि रोज हमखास कमवा. किंवा अमुक कोर्स करा आणि नोकरीइतके उत्पन्न मिळवा वगैरे वगैरे. या स्कीम्सना मी फसव्या अश्यासाठी म्हणतो, कारण "कष्ट केल्याशिवाय कोणत्याच क्षेत्रामध्ये पैसे मिळू शकत नाहीत" हे जगामधील एक अत्यंत कटु परंतु तरीदेखील वादातीत सत्य आहे. आणि या सर्व स्कीम्समध्ये हे सत्य झाकून ठेवले जाते आणि एक खोटे खोटे गोड स्वप्न लोकांना दाखवले जाते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे - "देअर आर नो फ्री लंचेस" म्हणजेच "जगात काहीच फुकट मिळत नाही". वास्तविक हे आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहे. अगदी शाळेत जायला लागल्यापासून "अभ्यास केल्याशिवाय मार्क मिळत नाहीत", "व्यायाम केल्याशिवाय तब्ब्येत चांगली राहत नाही", "नोकरी किंवा व्यवसाय केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत" ही सत्ये आपण कायम अनुभवत आलेलो आहोत. परंतु तरीदेखील शेअर मार्केटमधून आपल्याला कष्ट न करता आयते रोजचे पाचशे मिळावेत अशी इच्छा होते.


तर शेअर मार्केटमधून दिवसाला पाचशे रुपये कसे मिळवावेत या प्रश्नाच्या उत्तराकडे येऊयात. मुळात मिळवायचेच आहेत तर पाचशेच का? पाच लाख का नाही? किंवा पाच कोटी का नाही? आपली स्वप्ने अशी दरिद्री कश्यामुळे झाली? दिवसाला पाचशे वगैरे स्वप्ने ही अगतिकतेमधून पडतात. खरी स्वप्ने अगतिकतेतून नाही तर जिगरबाज पद्धतीने बघायची असतात आणि सद्‌सद्‌विवेकबुद्धी वापरुन पूर्णत्वाला न्यायची असतात! आणि ही स्वप्ने आपल्यासाठी कोणती स्कीम किंवा कोणता हिरो पूर्ण करीत नसतो तर आपण ती स्वतः पूर्ण करायची असतात. तुम्ही कधी सिंहाला अगोदरच मरुन पडलेले हरीण खाताना बघितले आहे का? सिंह कायम स्वतःची शिकार स्वतः करीत असतो आणि स्वतःच्या हिमतीवर जगत असतो.

एक गोष्ट लक्षात घ्या, शेअर मार्केट हा एक इतर कोणत्याही व्यवसायासारखाच व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या कमी दरात शेअर्सची खरेदी करुन ते शेअर्स जास्त दरामध्ये विकायचे असतात. शेअर्सचे भाव दररोज वरखाली होत असतात, आणि ज्या शेअर्सची किंमत आपल्या अपेक्षेनुसार वाढेल असे शेअर्स आपल्याला निवडायचे असतात. हा सर्व व्यापार करणे हे एक शास्त्र आहे. आणि आपल्याला हा व्यापार करायचा असेल तर हे शास्त्र आपल्याला शिकले पाहिजे. या शेअर मार्केटमध्ये व्यापार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जसे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट - यामध्ये आपल्याला दीर्घ मुदतीसाठी शेअर्स खरेदी करता येतात. किंवा पोझिशनल ट्रेडिंग - यामध्ये एक दोन आठवडे ते काही महिन्यांच्या कालावधीसाठी शेअर्स घेतले जातात आणि अपेक्षित फायदा मिळताच विकून टाकले जातात. आणि सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग - यामध्ये आज घेतलेले शेअर्स आजच्या आजच विकून टाकले जातात. या सर्व पद्धतींमध्ये प्रचंड फायदा मिळवून देण्याची क्षमता आहे आणि तितकीच रिस्कदेखील आहे. या रिस्क आणि रिवॉर्ड याचा अभ्यास करणे आपल्याला ठाऊकच नसते.


कोणताही व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आधी त्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनामधून बघितले पाहिजे. व्यवसायामध्ये मेहनत करावी लागते. आपण एका दुसर्‍या व्यवसायाचे उदाहरण घेऊ. तुमचे जर काही वस्तू विकण्याचे दुकान असेल तर ते दुकान वेळेवर उघडावे लागते, दिवसभर सर्व ग्राहकांशी व्यवस्थित बोलून हव्या त्या वस्तू द्याव्या लागतात. सतत विकल्या जाणार्‍या वस्तुंचा स्टॉक कायम करुन ठेवावा लागतो. विकल्या न जाणार्‍या वस्तू दुकानामधून काढून टाकाव्या लागतात. इतके करुनदेखील काही महिने नुकसानीमध्ये जाऊ शकतात त्याची तयारी ठेवावी लागते. हे जर तुम्ही सातत्यपूर्वक करीत राहिलात तर तुमचा हा दुकानाचा व्यवसाय यशस्वी होईल. यासाठी काही काळ जाईल. सुरुवातीला काही चुका होतील. या चुकांमधून शिकत शिकत तुमचे दुकान मोठे होईल आणि एक दिवस तुम्ही एका मोठ्या मॉलचे मालक होऊ शकाल आणि पुढे जाऊन तुमची डीमार्टसारखी एक जबरदस्त मॉल्सची साखळी तयार होईल. अगदी अश्याच प्रकारची प्रक्रिया तुमच्या शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये होत असते. याला "लर्निंग कर्व्ह" असे म्हणले जाते. शेअर मार्केट आणि इतर व्यवसायांमधील एक मोठा फरक हा आहे की इथे सुरुवात अतिशय कमीत कमी भांडवलामधून करता येते त्यामुळे प्रॅक्टिकली कोणीही व्यक्ती इथे यशस्वी व्यावसायिक होऊ शकते.


त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीचा कंटाळा आला असेल आणि कमी कष्टामध्ये झटपट रोजचे पाचशे हजार रुपये कमवायचे असेल तर शेअर मार्केट ही जागा तुमच्यासाठी नाही. शेअर मार्केटमध्ये येत असाल तर एका व्यावसायिकासारखे या. शिकण्याची आणि चुका करण्याची तयारी ठेवा. शिकण्यासाठी आवश्यक तो वेळ द्या. तसेच तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. हे जर तुम्ही केले तर हा शेअर बाजार पाचशे काय तुम्हाला पाच कोटी रुपये देऊन जाईल ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशामध्ये असे असंख्य लोक आहेत जे शेअर मार्केट यालाच पूर्णवेळ करिअर मानून काम करतात आणि समृद्ध होतात. फक्त तुमचा अ‍ॅटिट्यूड हा "अर्निंग"चा नसून "लर्निंग"चा असला पाहिजे!


शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. "गुंतवणूक कट्टा" या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा


नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक - https://marathimarket.in/youtube


अजून एक महत्वाचे -


शेअर बाजारामध्ये "इंट्राडे ट्रेडिंग" करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल - https://marathimarket.in/free-trial


फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.


गुंतवणूक कट्टा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनबद्दल -


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये एक "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.


या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)

2,865 views1 comment

1 Comment


chougulen995
Apr 08, 2022

100% खर आहे सर आम्हाला आपले विचार बदलले पाहिजे

Like
bottom of page