Search
  • Neeraj Borgaonkar

म्युच्युअल फंड सर्वांसाठी!

टीव्ही, पेपर सर्वत्र सध्या म्युच्युअल फंडांची जाहिरात सुरु आहे- "म्युच्युअल फंड सही है"

म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? 

पॅन कार्ड आहे? आधार कार्ड आहे? मग म्युच्युअल फंड तुमच्याचसाठी आहे!

म्युच्युअल फंड म्हणजे तुमचे आमचे पैसे आपण एका तज्ज्ञ फंड मॅनेजरकडे देतो 

या पैश्यांच्या बदल्यात आपल्याला त्या स्कीमची काही युनिट्स मिळतात. 

आपण दिलेले पैसे वापरुन हा फंड मॅनेजर आपल्यासाठी गुंतवणूक करतो. 

ही गुंतवणूक वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमधे होते. 

गुंतवणूकीचे उद्दीष्ट स्कीमच्या डॉक्युमेंटमधे नमूद केलेले असते जे आपल्याला गुंतवणूक करण्याआधी समजते. 

या तज्ज्ञ मॅनेजरने केलेल्या गुंतवणुकीमधे भांडवलवृद्धी झाली की आपल्याजवळ असणार्‍या युनिट्सची किंमत वाढते, या गुंतवणुकीची किंमत उतरली, तर आपल्या युनिट्सची किंमत कमी होते. 

आपल्या युनिटच्या किमतीला NAV म्हणजेच नेट अ‍ॅसेट व्हॅल्यु असं म्हणतात. 

म्युचुअल फंडांमधे "अगदी कमी रिस्क आणि बरे रिटर्न्स", "मध्यम रिस्क रिस्क आणि मध्यम रिटर्न्स" आणि "हाय रिस्क हाय रिटर्न्स" देणारे असे सर्व पर्याय उपलब्ध आहेत ज्यामधे आपण पैसे गुंतवु शकतो. 

आपले पैसे वेगवेगळ्या स्कीम्समधे विभागुन टाकले की रिस्क कमी होते. 

म्युच्युअल फंडांमधल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी रिव्ह्यू घेणं श्रेयस्कर आहे जेणेकरुन आपल्या गुंतवणूकीचा परफॉर्मन्स सुधारतो. 

हल्लीच्या दिवसांमधे म्युच्युअल फंडांमधली ही गुंतवणूक प्रत्येकासाठी आवश्यक झालेली आहे. बॅंकांचे व्याजदर अतिशय कमी झालेले आहेत. म्युच्युअल फंडांमधे दर महिना पाचशे रुपयांपासुन तुम्ही गुंतवणूक सुरु करु शकता. आणि "थेंबे थेंबे तळे साचे" या उक्तीनुसार तुमची संपत्ती वाढत जाते. गुंतवणूक करताना तज्ज्ञ सल्लागाराशी सल्लामसलत करावी, स्कीम पूर्णपणे समजुन घ्यावी आणि मग सुरुवात करावी.

42 views0 comments

Recent Posts

See All

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स ही हेजिंग इंस्ट्रुमेंटस्‌ आहेत. "हेज" या शब्दाचा अर्थ कुंपण असा आहे. कमॉडिटी, चलन आणि शेअर्सची किंमत सतत बदलत असते. या बदलत्या किमतीमुळे या कमॉडिटी, चलन अथवा चलनाच्या मालक असलेल

निफ्टी म्हणजे काय?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील निवडक शेअर्सच्या किमतींचं विशिष्ट पद्धतीने काढलेलं अ‍ॅव्हरेज म्हणजे निफ्टी इंडेक्स होय. निफ्टी हा शेअर बाजाराचा निर्देशांक समजला जातो. हा निफ्टी कसा कॅल्क्युलेट होतो? इंडेक्स