top of page
Search

मंदीवाल्यांना केले बाजाराने "एप्रिल फूल"!

दिनांक - 1 एप्रिल 2022


निफ्टी 17670.45 205.70

सेन्सेक्स 59276.69 708.18

बँकनिफ्टी 37148.50 774.90

डॉलर 75.97


निफ्टीमधील टॉप गेनर्स - NTPC BPCL POWERGRID INDUSINDBK HDFC


निफ्टीमधील टॉप लूझर्स - HEROMOTOCO TECHM DIVISLAB SBILIFE DRREDDY

आज 1 एप्रिल, नविन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. आज भारतीय शेअर बाजारामध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सकाळपासूनच तेजीचे वातावरण दिसत होते. दुपारी दीड नंतर ही तेजी अजूनच वाढली आणि बाजार एक मोठी झेप घेत 17688 या पातळीच्या जवळ बंद झाला. बॅंकनिफ्टीमध्येदेखील सकाळपासून तेजीचे वातावरण होते आणि दुपारी साडेबारानंतर बॅंकनिफ्टीमध्ये प्रचंड तेजी सुरु झाली आणि बॅंकनिफ्टी 34159 या पातळीवर बंद झाला. ऑटो सेक्टर, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, मिडिया, मेटल, रिअ‍ॅलिटी हे सर्व सेक्टर्स चांगल्या तेजीमध्ये होते. फक्त फार्मा शेअर्समध्ये थोडेसे नकारात्मक वातावरण दिसत होते.


गेल्या काही दिवसांपासूनच बाजारामध्ये तेजीचे वारे वाहत आहेत. निफ्टीसाठी पुढील रेझिस्टन्स पातळी 18200 च्या आसपास दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला 16800 या पातळीच्या जवळ एक स्ट्रॉंग असा सपोर्ट दिसत आहे. निफ्टी 17600 च्या वर टिकत असेल तर बाजारामध्ये तेजी कायम राहू शकते आणि बाजार वरची रेझिस्टन्स पातळी 18200 गाठू शकतो असे संकेत बाजारामध्ये दिसत आहेत. बॅंकनिफ्टीमध्ये देखील चांगली तेजी दिसत असून पुढील रेझिस्टन्स 37600 च्या आसपास दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला 35300 वर स्ट्रॉंग असा सपोर्ट दिसत आहे. 36300 ही पातळी जर टिकली तर बॅंकनिफ्टी वरची रेझिस्टन्स पातळी 37600 गाठू शकेल. निफ्टी व बॅंकनिफ्टी फ्युचर्स व ऑप्शन्स मध्ये काम करणार्‍यांसाठी एक बुलिश व्ह्यु घेऊन काम करण्याची संधी सध्या बाजारामध्ये दिसत आहे.


शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा


नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक - https://marathimarket.in/youtube


अजून एक महत्वाचे


शेअर बाजारामध्ये "इंट्राडे ट्रेडिंग" करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल - https://marathimarket.in/free-trial


फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये एक "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.


या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)


348 views0 comments

Yorumlar


bottom of page