:::गुंतवणूक कट्टा मार्केट अपडेट:::
दिनांक - 8 मार्च 2022
निफ्टी - 16,013.45 (+150.30)
सेन्सेक्स - 53,424.09 (+581.34)
बॅंकनिफ्टी - 33,158.10 (+286.85)
गोल्ड - 55,240
यु एस डॉलर - 76.93
निफ्टीमधील टॉप गेनर्स - IOC , SUNPHARMA , TATACONSUM , CIPLA , TCS
निफ्टीमधील टॉप लूझर्स - HINDALCO , ONGC , TATASTEEL , JSWSTEEL , BRITANNIA
बुल्स आणि बेअर्सची फाईट!
शेअर मार्केटमध्ये आपण नेहमी "बुल्स" आणि "बेअर्स" हे शब्द ऐकत आलेलो आहोत. आज आपण शेअर बाजारामधील बुल्स आणि बेअर्सच्या युद्धाबद्दल बोलणार आहोत. शेअर बाजारामध्ये दोन प्रकारचे ट्रेडर्स किंवा प्रवृत्ती अस्तित्वात असतात. जे बुल्स असतात त्यांना नेहमी असे वाटते की शेअर बाजार वर जावा. म्हणून ते सातत्यपूर्वक खरेदी करीत राहतात. आणि बेअर्स जे असतात त्यांना असे वाटते की शेअर बाजार खाली पडावा. म्हणून हे लोक सातत्यपूर्वक शेअर्सची विक्री करीत असतात. या दोन प्रवृत्तींचे युद्ध हे बाजारामध्ये कायम सुरु असते. "बुल" म्हणजे बैल. आणि "बेअर" म्हणजे अस्वल. बैल लढाई करताना समोरच्याला शिंगाने वर उडवून लावण्याचा प्रयत्न करतो तर अस्वल हे समोरच्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करीत असते. यामुळे शेअर बाजारामधील प्रवृत्तींना "बुल्स" आणि "बेअर्स" अशी नावे मिळालेली आहेत.
आज 8 मार्च रोजीचा बाजार (निफ्टी) जर बघितला तर आपल्याला या बुल्स आणि बेअर्सचे एक जबरदस्त युद्ध बघायला मिळाले. सकाळी बाजार सुमारे 15755 या पातळीवर उघडला. सध्या बाजारामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे थोडेसे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गेले काही दिवस आपण या बेअर्सची सरशी झालेली बघत होतो. आजदेखील दुपारी दीड वाजेपर्यंत हे बेअर्स युद्धामध्ये आघाडीवर होते. परंतु दीडनंतर अचानक बुल्समध्ये एक नविन शक्ती निर्माण झाली आणि सर्व बेअर्सना उधळून लावत शेअर बाजारातले बुल्स बाजार वर वर नेण्यामध्ये यशस्वी झाले. आणि अतिशय अनपेक्षितरित्या शेअर बाजार 16017 या पातळीपर्यंत वर जाऊन बंद झाला.
बुल्स आणि बेअर्सच्या या लढाईमध्ये पैसे मिळवण्याच्या भरपूर संधी दडलेल्या असतात. या संधी ओळखण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे ज्ञान असणे हे अतिशय आवश्यक आहे. शेअर बाजारामधील सर्व चढ-उतार हे एका चार्टवर रेकॉर्ड होत असतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की या चार्ट्समधील पॅटर्न्स हे बरेचदा रीपीट झालेले आपल्याला दिसून येतात. या चार्ट्सवर गणितीय अभ्यास करुन काही इंडिकेशन्सदेखील मिळवता येतात. ही इंडिकेशन्स वापरुन आपण बाजारमधील या बुल्स आणि बेअर्सच्या युद्धामध्ये कोणाची सरशी होईल याचा अंदाज लावू शकतो. चार्ट्सचा अभ्यास करणे हे एक शास्त्र आहे. या शास्त्राला "टेक्निकल अॅनालिसिस" असे नाव आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून हे शास्त्र अस्तित्वात आहे. टेक्निकल अॅनालिसिस करण्याच्या विविध पद्धती तसेच शेअर बाजारामध्ये काम कसे करावे याचे सविस्तर प्रशिक्षण मराठी बाषेमधून घेण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. "गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.
या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.
रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar
(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)
वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar
इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म - https://investor.guntavnook.com
RTSS फ्री ट्रायल - https://marathimarket.in/free-trial
टेलिग्राम चॅनल - https://marathimarket.in/telegram
फेसबूक ग्रुप - https://marathimarket.in/facebook
मुख्य वेबसाईट - https://www.guntavnook.com
सपोर्ट ईमेल - connect@guntavnook.com
Comentários