आज 15 मार्च रोजी झालेल्या ट्रेडिंगमध्ये तेजी करणार्या ट्रेडर्सना एक झटका बसलेला दिसून आला. गेले काही दिवस भारतीय शेअर बाजार हा एका डाऊनट्रेंडमध्ये गेलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेली युद्धजन्य स्थिती, डॉलरसमोर सातत्यपूर्वक घसरणारा रुपया, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांद्वारे (FII) सुरु असलेली विक्री या सर्व कारणांमुळे आपल्या शेअर बाजारामध्ये हा डाऊनट्रेंड सुरु झालेला आहे. 8 मार्च या दिवसापासून बाजारामध्ये थोडेसे कव्हरिंग दिसून येत होते. या कव्हरिंगचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाचे म्हणजेच क्रूड ऑईलचे भडकलेले भाव थोडेसे खाली पडायला लागले. यामुळे साहजिकपणे बुल्समधील आशेचा किरण जागृत झाला आणि शेअर बाजारामध्ये थोडीशी तेजी बघायला मिळाली. परंतु सध्याचा एकूण तांत्रिक कल हा नकारात्मक असल्यामुळे आजच्या सत्रामध्ये बुल्स आणि बेअर्सच्या या लढतीमध्ये बेअर्सनी, म्हणजेच मंदीवाल्या ट्रेडर्सनी बाजी मारली आणि शेअर बाजार (निफ्टी) सुमारे दोनशे पॉईंट्स खाली पडला.
आजच्या सत्रामध्ये सकाळी बाजार सुमारे 16900 च्या पातळीजवळ उघडला. सुरुवातीचे तीन तास म्हणजेच सुमारे साडेबारा वाजेपर्यंत बाजार सुमारे 16900 ते 16800 एका रेंजमध्येच खेळत राहिला. परंतु साडेबारानंतर जेव्हा बाजाराने ही रेंज खालच्या दिशेने तोडली त्यानंतर मात्र बाजार जोरात खाली पडल्याचे दिसून आले. अश्या पद्धतीच्या बाजारामध्ये O.R.B. अर्थात "ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट" ही स्ट्रॅटेजी अतिशय प्रभावी पद्धतीने वापरता येते आणि अतिशय उत्तम असे रिझल्ट्स मिळवता येतात. पुढील इमेजमध्ये तुम्हाला निफ्टीचा आजचा चार्ट व त्यामध्ये ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट कसा झाला हे बघता येईल
ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट ही स्ट्रॅटेजी कशी वापरावी हे मी माझ्या एका पूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित शिकवलेले आहे. पुढील लिंकवर हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल
शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज् असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करुन ठेवा.
गुंतवणूक कट्टा (नीरज बोरगांवकर) युट्यूब चॅनलची लिंक - https://marathimarket.in/youtube
शेअर बाजारामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल - https://marathimarket.in/free-trial
फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आले तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.
Comments