top of page
Search

पुट बायर्सची सध्याची अवस्था - आई जेवू घालीना अन्‌ बाप भीक मागू देईना!

गेले काही दिवस आपल्या शेअर बाजारामध्ये एक वेगळाच खेळ चालू आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला. गेली अनेक वर्षे बाजारामध्ये एक ठराविक पॅटर्न दिसून येत असे. बाजार मोठ्या प्रमाणावर वाढत असे, त्यानंतर अशी काहीतरी खळबळजनक घटना घडत असे, त्याचसोबत विदेशी गुंतवणूकदार, अर्थात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स (FIIs) आपला पैसा बाजारामधून काढून घेत असत आणि आपला बाजार जोरदार खाली कोसळत असे. परंतु करोना व्हायरसनंतर आपल्या बाजारामध्ये जी तेजी आली ती अभूतपूर्व अशी तेजी आहे. या तेजीमध्ये बाजार खाली पडावा अश्या अनेक घटना घडल्या. FIIs नी सातत्यपूर्वक विक्रीचा सपाटादेखील लावला. गेले अकरा बारा महिने FIIs सतत शेअर्स विकत आहेत. परंतु आपला शेअर बाजार काही अपेक्षेप्रमाणे कोसळताना दिसून येत नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारामध्ये उभी राहिलेली तिसरी आघाडी! इतकी वर्षे शेअर बाजारामध्ये दोनच आघाड्या अस्थित्वात होत्या - FIIs आणि DIIs. FII म्हणजे काय हे आपण वर बघितले. DII म्हणजे "डॉमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स" म्हणजे आपले देशी म्युच्युअल फंड्स, इन्श्युरन्स कंपन्या इत्यादी. इतकी वर्षे बाजारात हे दोनच प्रभावी प्लेअर्स होते. परंतु बाजारामध्ये सध्या नव्याने उभी राहिलेली तिसरी आघाडी म्हणजेच रिटेल गुंतवणूकदार! करोना नंतर जो लॉकडाऊन झाला, त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर बाजारामध्ये रिटेल गुंतवणूकदारांची थेट गुंतवणूक आली आणि जी अजूनही दररोज येत आहे. बाजारामध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा थेट पैसा इतका मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आपला शेअर बाजार अजून इतक्या तेजीमध्ये टिकून राहिलेला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.


रशिया युक्रेन युद्धपरिस्थिती ही सर्व "बेअर्स"ना म्हणजेच मंदीवाल्या प्लेअर्सना एक मोठी संधी आहे असे वाटले आणि त्या सर्वांनी बेअरिश पोझिशन्स घेणे सुरु केले. 8 मार्च या दिवशी बाजाराने (निफ्टी) 15671 चा लो दाखवल्यानंतर अनेक ट्रेडर्सना असे वाटू लागले, की आता येत्या मासिक एक्स्पायरीला म्हणजेच 31 मार्च या दिवसापर्यंत बाजार 15000 च्या खाली बंद होणार! म्हणून या सर्वांनी मंदीच्या पोझिशन्स घेणे सुरु केले.


मंदीच्या सामान्यतः घेतल्या जाणार्‍या पोझिशन्स


- फ्युचर शॉर्ट करणे

- कॉल ऑप्शन विकणे

- पुट ऑप्शन खरेदी करणे


फ्युचर शॉर्ट करण्यासाठी व कॉल ऑप्शन विकण्याकरिता मोठे मार्जिन लागते. त्यामुळे जे लहान ट्रेडर्स आहेत त्यांनी पुट ऑप्शन्स खरेदी करणे सुरु केले. पुट ऑप्शन्स खरेदी करण्यासाठी अतिशय किरकोळ रक्कम गुंतवावी लागते. उदाहरणार्थ 8 व 9 मार्च या दिवशी निफ्टीचा 15000 चा पुट ऑप्शन 200 रुपयांना मिळत होता. ज्याचा एक लॉट घेण्याकरिता फक्त 10000/- रुपयांचे भांडवल लागत होते. मंदीवाल्या ट्रेडर्सच्या अंदाजानुसार जर मार्केट एक्स्पायरीला 14000 वर आले असते तर या दहा हजारांचे पन्नास हजार रुपये झाले असते आणि त्यांच्या गुंतवणुकीवर 400% परतावा मिळाला असता. या मोठ्या मोहापोटी अनेक ट्रेडर्सनी 15000 चा पुट खरेदी केला. परंतु बाजारामध्ये आले रिव्हर्सल! त्यामुळे सध्या या पुट ऑप्शनची किंमत झाली आहे 4 रुपये. आता हे सर्व पुट ऑप्शन बायर्स अतिशय चिंतेमध्ये आहेत. कारण त्यांच्या दहा हजारांची किंमत सध्या फक्त दोनशे रुपये होऊन बसलेली आहे. लॉस बूक करावा तर मार्केट खाली पडण्याची भीती. पोझिशन होल्ड करावी तर पैसे शून्य होण्याची भीती. थोडक्यात आई जेवू घालीना अन्‌ बाप भीक मागू देईना!


नविन ऑप्शन ट्रेडर्सना अश्या परिस्थितीचा सामना अनेक वेळा करावा लागतो. याकरिताच हा विषय पूर्ण समजून घेऊन मगच आपले कष्टाचे पैसे गुंतवणे हे योग्य ठरते. सर्वसामान्य ट्रेडरला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन कसे काम करतात हेच माहित नसते. त्याला फक्त हे ठाऊक की वर जात असेल तर कॉल घ्यायचा आणि खाली पडत असेल तर पुट घ्यायचा. पण हा विषय इतका सरळ नाही. आपला बाजाराबद्दलचा व्ह्यु जर मंदीचा असेल (जसा बर्‍याच जणांचा 8 मार्च रोजी होता) तर आपण ऑप्शन्समध्ये काही कॉम्बिनेशन स्ट्रॅटेजी लावून काम करु शकतो. अश्या अनेक स्ट्रॅटेजी आहेत ज्यांमध्ये आपली रिस्क कमी होते आणि मार्केटच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण काही अ‍ॅडजस्टमेंट्स करुन आपला लॉस कमी करु शकतो.


ऑप्शन्समध्ये स्ट्रॅटेजी कश्या वापरल्या जातात हे समजावून सांगण्याकरिता मी काही दिवसांपूर्वी एक युट्यूब सेशन घेतला होता. पुढील लिंकवर हा सेशन तुम्हाला बघता येईल - https://youtu.be/3WGbuW9KhvM

Neeraj Borgaonkar या माझ्या युट्यूब चॅनलवरचे इतर व्हिडिओज्‌देखील आवर्जून बघा ज्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अनेक गमतीजमती सोप्या भाषेमध्ये शिकायला मिळतील.


शेअर मार्केट, फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सेगमेंटमध्ये भरपूर संधी दडलेल्या आहेत. परंतु या संधी मिळवण्यासाठी हा विषय आणि यामधील सर्व खाचाखोचा नीट समजून घेणे अतिशय आवश्यक आहे. गुंतवणूक कट्ट्याद्वारे एक पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन नावाचा परीपूर्ण ऑनलाईन कोर्स चालवला जातो ज्यामध्ये तुम्हाला हा सर्व विषय नीट शिकण्याची संधी मिळते. या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची पूर्ण माहिती देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. पुढील लिंकवरुन या वेबिनारसाठी रजिस्टर करता येईल.


वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


इतर कोणत्याही शंकेकरिता connect@guntavnook.com येथे ईमेल करावी.

479 views2 comments

2 Comments


bdjadhavar526
Mar 22, 2022

nice

Like

mukeshbcool
Mar 22, 2022

best

Like
bottom of page