Search
  • Neeraj Borgaonkar

निफ्टी म्हणजे काय?

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील निवडक शेअर्सच्या किमतींचं विशिष्ट पद्धतीने काढलेलं अ‍ॅव्हरेज म्हणजे निफ्टी इंडेक्स होय. निफ्टी हा शेअर बाजाराचा निर्देशांक समजला जातो. हा निफ्टी कसा कॅल्क्युलेट होतो?

इंडेक्समधल्या कंपन्या खालील काही निकषांद्वारे निवडल्या जातात-

१- लिक्विडिटी- ज्या शेअर्समधे स्पेसिफाईड लिक्विडिटी म्हणजे तरलता आहे. ‌२- इम्पॅक्ट कॉस्ट- समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स मी खरेदी केले, आणि लगेच ते विकले तर मला किती नुकसान होईल ती किंमत म्हणजे इम्पॅक्ट कॉस्ट होय. गेल्या सहा महिन्यात दोन करोड रुपयांचे व्यवहार करताना लागणारी इम्पॅक्ट कॉस्ट ०.५०% पेक्षा कमी असणारी कंपनी निफ्टीमधे समाविष्ट होण्यास पात्र आहे. ३- फ्लोट- निफ्टीमधे येणार्‍या कंपनीचे किमान दहा टक्के शेअर्स हे गुंतवणूकदारांकडे असले पाहिजेत. नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त स्टॉक प्रमोटर किंवा संबंधित संस्थांकडे असेल तर तो शेअर निफ्टीमधे येऊ शकत नाही. ४- डोमिसाईल- कंपनी भारतीय असावी आणि NSE वर लिस्टेड असावी.

आयपीओ द्वारे इक्विटी शेअर्सचे वितरण करणारी आणि इतर निकषांचे पालन करणारी कंपनी निफ्टीमधे समाविष्ट होण्यास पात्र आहे. आता आपण बघुयात निफ्टीचे कॅल्क्युलेशन कसे होते?

३ नोव्हेंबर १९९५ ही बेस डेट समजली गेली आहे. या दिवशी बेस इंडेक्स व्हॅल्यू १००० होती हे ग्राह्य धरलेले आहे. त्या वेळी निफ्टीमधे असलेल्या पन्नास कंपन्यांचे व्हॅल्युएशन 2060000000000/- इतके होते. ते आता सुमारे 1900000000000000/- इतके आहे. यामधे फक्त फ्री फ्लोट मार्केट कॅप कॅल्क्युलेशनसाठी ग्राह्य धरले जाते. फ्री फ्लोट मार्केट कॅप म्हणजे काय? तर प्रमोटरकडे असलेले शेअर्स, एक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणुन सरकारकडे असलेले शेअर्स, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणुन कॉर्पोरेट बॉडीजकडे असलेले शेअर्स, FDI कॅटॅगरी मधील गुंतवणूक, क्रॉस होल्डिंग मधे असलेले शेअर्स, लॉक-इन मधे असलेले शेअर्स, एम्प्लॉयी वेल्फेअर ट्रस्टकडे असलेले शेअर्स हे वगळुन बाजारामधे फ्री असणारे शेअर्स किती आहेत हे IWF (इन्व्हेस्टिबल वेट फॅक्टर्स) च्या माध्यमातुन मोजले जाते आणि त्या फ्री शेअर्सचे मार्केट व्हॅल्युएशन बघितले जाते. याला फ्री फ्लोट मार्केट कॅप असे म्हणतात.

"सध्याचे फ्री फ्लोट मार्केट कॅप भागिले बेस मार्केट कॅपिटल गुणिले बेस इंडेक्स व्हॅल्यू" याची जी किंमत येते ती म्हणजे आपल्याला दिसणारा निफ्टी निर्देशांक होय.

-नीरज बोरगांवकर

206 views0 comments

Recent Posts

See All

म्युच्युअल फंड सर्वांसाठी!

टीव्ही, पेपर सर्वत्र सध्या म्युच्युअल फंडांची जाहिरात सुरु आहे- "म्युच्युअल फंड सही है" म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? पॅन कार्ड आहे? आधार कार्ड आहे? मग म्युच्युअल फंड तुमच्याचसाठी आहे! म्युच्युअल फ

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स

फ्युचर्स अ‍ॅंड ऑप्शन्स ही हेजिंग इंस्ट्रुमेंटस्‌ आहेत. "हेज" या शब्दाचा अर्थ कुंपण असा आहे. कमॉडिटी, चलन आणि शेअर्सची किंमत सतत बदलत असते. या बदलत्या किमतीमुळे या कमॉडिटी, चलन अथवा चलनाच्या मालक असलेल