top of page
Search

तेजीचे वारे?

:::गुंतवणूक कट्टा मार्केट अपडेट:::


दिनांक - 9 मार्च 2022


निफ्टी - 16,345.35 (+331.90)

सेन्सेक्स - 54,647.33 (+1223.24)

बॅंकनिफ्टी - 33815.45 (+657.35)

गोल्ड - 55,900

यु एस डॉलर - 76.55


निफ्टीमधील टॉप गेनर्स - ASIANPAINT , RELIANCE , BAJFINANCE , INDUSINDBK , M&M

निफ्टीमधील टॉप लूझर्स - SHREECEM , ONGC , POWERGRID , NTPC , COALINDIAतेजीचे वारे?


गेले काही दिवस युद्धाच्या पार्श्वभूमीवर मंदीमध्ये जाणारा आपला शेअर बाजार आज जोरात उसळल्याचे दिसून आले. रिलायन्स, एशियन पेंट्स यासारख्या काही शेअर्समध्ये गेले काही दिवस जी पडझड सुरु होती तिला आजच्या सत्रामध्ये ब्रेक लागल्याचे दिसून आले, आणि त्यामुळे निफ्टी निर्देशांकामध्ये एक मोठी उसळी दिसून आली. काल व आज जरी बाजारामध्ये तेजी दिसलेली असेल, तरी बाजाराचा एकूण कल हा सध्या मंदीचाच दिसत आहे. सध्याचा काळ हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असा काळ आहे. कारण बाजाराचा पीई रेश्यो हा सध्या 20 व 21 च्या मध्ये आहे. पीई रेश्यो म्हणजे काय याचे सविस्तर विवेचन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळेल -
पोझिशनल ट्रेडर्ससाठी सध्याचा काळ थोडासा व्होलटाईल आहे. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे थोड्या कालावधीसाठी शेअर्स घेणे आणि भाव वाढल्यावर ते शेअर्स विकून नफा बूक करणे. अश्या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये शेअर्स दीर्घकाळ होल्ड करण्याची आवश्यकता नसते. सध्याचा बाजाराचा एकूण कल हा नकारात्मक असल्यामुळे पोझिशनल ट्रेडर्सनी काळजी घेणे आवश्यक आहे. एखादी पोझिशन घेताना आपला "स्टॉप लॉस" किती हे अगोदर ठरवुन मगच ट्रेड घेणे योग्य राहील.


ट्रेडिंगचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. या प्रकारामध्ये आज शेअर्स घ्यायचे आणि आजच ते विकून टाकायचे या तत्वावर काम केले जाते. शेअर बाजार सध्या व्होलटाईल असल्यामुळे सध्या इंट्राडे ट्रेडर्ससाठी बाजारामध्ये खूप मोठ्या संधी मिळत आहेत. इंट्राडे ट्रेडिंग करणे सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल -


फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांची पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आले तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक "पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन" नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.


या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar(वरील माहिती हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तसेच सर्व माहिती ही इंटरनेटवरुन घेण्यात आली असून त्याच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी गुंतवणूक कट्टा घेत नाही)
वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक - https://www.guntavnook.com/webinar


इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्म - https://investor.guntavnook.com


RTSS फ्री ट्रायल - https://marathimarket.in/free-trial


टेलिग्राम चॅनल - https://marathimarket.in/telegram


फेसबूक ग्रुप - https://marathimarket.in/facebook


मुख्य वेबसाईट - https://www.guntavnook.com


सपोर्ट ईमेल - connect@guntavnook.com
297 views0 comments

Comentarios


bottom of page