top of page
Search

इंट्राडे ट्रेडिंग - धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय!


भारतीय शेअर बाजार हा एक संधींचा समुद्र आहे असे नेहमी म्हणले जाते आणि ते खरेदेखील आहे. परंतु सर्वांनाच या संधींचा योग्य लाभ घेता येतोच असे नाही. या शेअर बाजारामध्ये असंख्य विचारप्रवाह आहेत. कोणी म्हणते की शेअर बाजारामध्ये फक्त लॉंग टर्म गुंतवणूक केली तरच पैसा बनतो. कोणी म्हणते की लॉंग टर्म गुंतवणुकीपेक्षा ट्रेडिंगमध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. कोणी म्हणते की शेअर बाजार हा निव्वळ जुगार आहे आणि या ठिकाणी येणारी व्यक्ती पुरती कंगाल होऊनच बाहेर पडते. ही सर्व व्यक्तीसापेक्ष मते आहेत. प्रत्येकजण स्वतःला आलेल्या अनुभवावरुन किंवा कोणाकडूनतरी ऐकलेल्या गोष्टींवर अशी मते तयार करीत असतो आणि ती मते जगापुढे मांडत असतो.

एक जुनी गोष्ट आपण सर्वांनी ऐकलेली आहे. चार अंध व्यक्तींसमोर एक हत्ती आणून उभा केला आणि प्रत्येक अंध व्यक्तीला विचारण्यात आले की हत्ती कसा आहे ते सांगावे. एक व्यक्ती म्हणाला हत्ती खांबासारखा आहे, कारण त्याने हत्तीच्या पायाला स्पर्श करुन हे मत व्यक्त केले होते. दुसर्‍याने हत्तीच्या पाठीला स्पर्श करुन हत्ती भिंतीसारखा आहे असे सांगितले. तिसरा म्हणाला की हत्ती एका नळीसारखा आहे कारण त्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला. आणि चौथा म्हणाला की हत्ती शिंगासारखा आहे, कारण त्याने हत्तीच्या दातांवरुन हा अंदाज व्यक्त केला. पूर्ण हत्ती कसा आहे हे कोणालाही सांगता आले नाही कारण प्रत्येकाने आपल्या अनुभवाद्वारे आपले मत व्यक्त केले होते.

शेअर बाजार आणि त्यामधील संधी हे वरील गोष्टीमध्ये सांगितलेल्या हत्तीप्रमाणे आहे. जोपर्यंत आपण डोळे आणि डोके उघडे ठेवून यामधील प्रत्येक संधी काय आहे आणि तिचा फायदा कसा मिळवायचा हे समजून घेत नाही तोवर या संधींचा आपल्याला काहीही उपयोग नाही. पण हेच जर आपण पूर्ण अभ्यास करुन प्रत्येक संधीची व्यवस्थित माहिती करुन घेतली तर आपल्याकरिता खूप द्वारे उघडली जातात.


आजच्या लेखामध्ये आपण अश्याच एका संधीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे "इंट्राडे ट्रेडिंग". सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर आज शेअर्स घेणे आणि आजच्या आजच ते विकून नफा मिळवणे! बरेच लोक शेअर मार्केटमधील कारकीर्दीची सुरुवात इंट्राडे ट्रेडिंगने करतात. परंतु बरेचदा या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लोकांना अपयश येते आणि पैश्यांचे नुकसान होते ही वस्तुस्थिती आहे. याचे मुख्य कारण असे की इंट्राडे ट्रेडिंग हे प्रामुख्याने "लोभ" या भावनेमुळे सुरु केले जाते आणि "भीती" या भावनेमुळे बंद केले जाते. एखादा शेअर वाढेल असे आपण कोणाच्यातरी "टिप" मध्ये किंवा टीव्हीवर बघतो, आपल्या मनामधील लोभ जागृत होतो, काही वेळानंतर शेअरचा भाव आपल्या ट्रेडच्या विपरीत चालायला लागला की आपण भयभीत होतो आणि घाबरुन शेवटी आपण आपले शेअर्स लॉसमध्ये विकून टाकतो. गेली वीस वर्षे मी हजारो ट्रेडर्सच्या बाबतीमध्ये हेच घडताना बघितलेले आहे. इतकेच काय, माझा स्वतःला पहिला ट्रेडदेखील असाच झाला होता. त्याकाळी सिंडिकेट बॅंक नावाच्या एका शेअरमध्ये (सध्याची कॅनरा बॅंक) मी असाच इंट्राडे ट्रेड केलेला होता आणि त्यामध्ये मला बाराशे रुपयांचे नुकसान झालेले मला आजदेखील चांगले आठवते.


हे सर्व असेच घडते याच्यामागील कारणांचा मी अभ्यास केला आणि यावरुन मला एक लक्षात आले, की इंट्राडे ट्रेडिंग करताना "लोभ" आणि "भीती" या भावनांना आवर घातला पाहिजे आणि "अभ्यास" ही एकच भावना आपण आपल्यामध्ये बाणवली पाहिजे. शेअर्सच्या किमतीमध्ये जे चढ-उतार होतात त्यामागे "डिमांड" आणि "सप्लाय" (अर्थात मागणी आणि पुरवठा) हे जबाबदार असतात. जेव्हा जेव्हा एखाद्या शेअरची मागणी बाजारामध्ये वाढते तेव्हा तेव्हा शेअरचा भाव वाढतो आणि जेव्हा जेव्हा एखाद्या शेअरमधील पुरवठा वाढतो तेव्हा तेव्हा त्या शेअरचा भाव खाली पडतो. गेली शेकडो वर्षे प्रत्येक बाजारामध्ये हेच घडत आलेले आहे आणि हे असेच घडत राहणार. या मागणी आणि पुरवठ्याच्या स्थितीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला शेअर खरेदी करायची आणि विक्री करायची योग्य वेळ साधणे शक्य होईल. हा अभ्यास करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. "टेक्निकल अ‍ॅनालिसिस" या शास्त्रामध्ये आपल्याला या पद्धती शिकून घेता येतात.


"रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स" ही अशीच एक पद्धत आहे जी वापरुन आपण सध्या कोणता शेअर "ओव्हरसोल्ड" आहे आणि कोणता शेअर "ओव्हरबॉट" आहे हे जाणून घेऊ शकतो. "रिलेटिव्ह स्ट्रेन्ग्थ इंडेक्स" म्हणजेच RSI हा एक इंडिकेटर आहे आणि हा इंडिकेटर वापरुन आपल्याला काही शेअर्स मिळतात जे सध्या "ओव्हरसोल्ड" झोनमध्ये आहेत. म्हणजेच या शेअर्समध्ये विक्री खूप जास्त झालेली असून आता इथे मागणी येण्याची शक्यता आहे. या शेअर्सचा विचार आपण इंट्राडे खरेदीकरिता करु शकतो. तसेच या इंडिकेटरद्वारे आपल्याला हेदेखील समजते, की कोणते शेअर्स सध्या "ओव्हरबॉट" झोनमध्ये आहेत. या शेअर्सचा विचार आपण इंट्राडे "शॉर्ट सेलिंग"साठी करु शकतो. या ओव्हरबॉट झोनमधील शेअर्समध्ये खूप जास्त खरेदी झालेली असते आणि आता यामध्ये विक्री येण्याची शक्यता असते. म्हणजेच आपण कोणत्याही टिपवर अवलंबून न राहता अभ्यासाच्या आधारावर हे ट्रेड्स घेऊ शकतो.


शेअर बाजारामध्ये हजारो शेअर्स दररोज ट्रेड होत असतात. मग या हजारो शेअर्समधून असे ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड शेअर्स शोधायचे कसे? याकरिता आपल्या "गुंतवणूक कट्ट्या"द्वारे RTSS नावाची एक सिस्टीम चालवली जाते. RTSS हा एक टेलिग्राम चॅनल आहे आणि हा टेलिग्राम चॅनल आम्ही आपल्या अल्गो सॉफ्टवेअरशी जोडलेला आहे. आपले सॉफ्टवेअर दररोज शेअर बाजारामधील ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड शेअर्स शोधत राहते व त्याला सापडलेले शेअर्स आपल्या या टेलिग्राम चॅनलमध्ये रिअल टाईम पोस्ट करते. या टेलिग्राम चॅनलचे जर तुम्ही सभासद असाल तर तुम्हाला हे रिअल टाईम अपडेट्स दररोज तिथे दिसून येतात. RTSS या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला हे रिअल टाईम अपडेट्स वापरुन काम कसे करावे याबद्दलचा ट्रेनिंग व्हिडिओदेखील मिळतो, तसेच चार्टवर लावण्यासाठी "इंट्राडे लेव्हल्स" नावाचा एक स्पेशल इंडिकेटरदेखील मिळतो. ही स्ट्रॅटेजी वापरुन तुम्ही यशस्वीरित्या इंट्राडे ट्रेडिंग शिकू शकता.


RTSS हा एक सबस्क्रिप्शन बेस्ड चॅनल आहे ज्याचे दरमहाचे सबस्क्रिप्शन तुम्हाला भरावे लागते. सध्या या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल आम्ही तुम्हाला देत आहोत जेणेकरुन दोन आठवडे तुम्ही मोफत या चॅनलचे सभासद होऊ शकाल आणि याचे अपडेट्स प्रत्यक्ष वापरुन बघु शकाल. दोन आठवडे ट्रायल घेतल्यानंतर जर तुम्हाला हा उपक्रम फायदेशीर वाटला तर तुम्ही पुढे याचे सबस्क्रिप्शन भरुन तुमचे सभासदत्व कंटिन्यु करु शकता.


RTSS ची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल कशी घ्यावी?


* सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये "टेलिग्राम" हे अ‍ॅप डाऊनलोड करुन इन्स्टॉल करुन घ्या. (हे एक व्हॉट्सअ‍ॅपसारखेच संदेशवहनाचे अ‍ॅप आहे जे तुम्हाला अ‍ॅप स्टोअर किंवा प्ले स्टॉअरवरुन मिळते)


* हे झाले की पुढील लिंकवर क्लिक करा - https://marathimarket.in/free-trial


* ही लिंक तुम्हाला टेलिग्राम अ‍ॅपमध्ये घेऊन जाईल व तिथे तुम्हाला START असे बटण दिसेल त्या बटणावर क्लिक करा


* आता तुम्हाला Free Trial: 2 weeks असे एक बटण दिसेल त्यावर क्लिक करा.


* हे केले की तुम्हाला RTSS या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलचे "जॉईन बटण" पाठवले जाईल. हे बटण वापरुन RTSS टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा व तिथे पोस्ट होणारे अपडेट्स बघत रहा.इतर कोणत्याही शंकेसाठी आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा. तुमच्या शंकेला 24 तासांमध्ये उत्तर दिले जाईल.

गुंतवणूक कट्ट्याबद्दल थोडेसे


"गुंतवणूक कट्टा" हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये शेअर मार्केट, गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स, फ्युचर्स ऑप्शन्स या विषयांचे प्रशिक्षण सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला घेता येते. गुंतवणूक कट्ट्याची माहिती तुम्हाला देण्याकरिता एका खास मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.


वेबिनार लिंक - https://www.guntavnook.com/webinar


डिस्क्लेमर -

म्युच्युअल फंड व शेअर बाजारामधील गुंतवणुकीमध्ये जोखीम समाविष्ट असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर योजनेसंबंधीची कागदपत्रे व तपशील पूर्ण समजून घ्यावा. तसेच आवश्यक वाटल्यास आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत अवश्य करावी. या लेखामध्ये तसेच गुंतवणूक कट्ट्याच्या कोणत्याही उपक्रमामध्ये गुंतवणुकीचा कोणताही सल्ला दिला जात नसून गुंतवणूक या विषयाबद्दल प्रबोधन करण्याचे कार्य केले जात असते याची नोंद घ्यावी.


641 views0 comments

コメント


bottom of page