मेंबर्स वॉल
Mohan Pashte
मी 2020 मधे PBP कोर्स जॉईन केला आहे. या कोर्समुळे मला शेअर मार्केट विषयी संपूर्ण ज्ञान तर मिळालेच पण त्याव्यतिरिक्त माझ्या जीवनात सरांमुळे आर्थिक शिस्त निर्माण झाली आहे कारण सर फक्त शेअर मार्केट शिकवत नसून आपल्या विद्यार्थ्यांना आर्थिक शिस्त कशी लागेल, ट्रेडिंग करताना आपला माईंडसेट कसा असावा, आपली विचार करण्याची पद्धत कशी असावी ह्या गोष्टीवर विशेष भर देत असल्यामुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास सुद्धा खूप मदत झाली आहे. आणि याच गोष्टीमुळे मी आज इंडिपेंडंट ट्रेडिंग आणि investment करत आहे, सर नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शंकांचे निरसन करत असतात त्यामुळे आपल्याला एक चांगली सपोर्ट सिस्टम मिळते. सरांबद्दल मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे सर एक अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत, कोणतीही खोटी आश्वासने आणि दिखाऊपणा करत नाहीत त्यामुळेच मी या कोर्सकडे आकर्षित झालो आणि आज मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की मी नीरज सरांचा विद्यार्थी आहे.
धन्यवाद सर.
Sunil Rathod
मला investment बद्दल काहीही माहिती नव्हती मला माझ्या एका मित्राने मला गुंतवणुकीबद्दल सांगितले, तसेच त्यानेच मला तुमच्या गुंतवणूक कट्टा बद्दल सांगितले व YouTube channel subscribe करून दिले व सांगितले की जर तुला teaching व पद्धत आवडली तर तू गुंतवणूक कट्टा सभासद हो. सर मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडते आपण खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करता मी पोलिस असल्याने मला जास्त वेळ भेटत नसल्याने मी जास्त ग्रुप मध्ये active नसतो. परंतु pbp discription मधील सर्व मॅसेज वाचतो याचा मला खूप फायदा होतो.ग्रूपमधील सदस्य पण खूप चांगले आहेत. आज माझा ₹ 700000 portfolio आहे व sip मध्ये ₹200000 जमा झाले आहे. हे सर्व तुमच्यामुळे मार्गदर्शनामुळे झाले आहे.
खूप खूप धन्यवाद सर....
Dilip Rakh
सरांच्या गुंतवणूक कट्टा या उपक्रमामुळे शेअर मार्केटची एबीसीडी कळाली असून शेअर मार्केटमध्ये फक्त लॉन्ग टर्ममुळेच आपले पोर्टफोलिओ द्वारे वेल्थ वाढत असते.
Sandeep Asawale
मी संदीप आसवले २०१८-२०१९ पासूनचा एक “PBP” मेंबर असून, वास्तविक पाहता काय अभिप्राय द्यावा काही योग्य शब्दच सुचत नाहीयेत. शेअर मार्केट मधील सर्व कन्सेप्ट इतक्या छान, अगदी सर्वसान्यांना सुद्धा समजतील अश्या सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सरांनी आम्हाला ( सर्व विद्यार्थ्यांना ) समजावून संगितले आहेत कि एरवी शेअर मार्केट हा सर्वांनाच किचकट वाटणारा विषय पण आवडीचा होऊन जातो. खरतर दर शनिवारी नीरज सर जो लाईव सेशन घेतात तो एका तासाच्या ऐवजी 2-3 तासांचा असावा असे वाटते. त्यांनी मांडलेली “CALL PE BAAT” ही संकल्पना काही औरच ! सरांनी शिकविलेल्या गोष्टींचे मूल्य हे असे शब्दांत मांडण्याइतके छोटे नाही. केवळ “अप्रतिम” तूर्तास इतकेच सांगता येईल.
Atul Lotlikar
माझं नाव अतुल लोटलीकर आहे, आणि मी "गुंतवणूक कट्टा" चा एक सदस्य आहे. गुंतवणूक कट्टाशी जोडले जाणं हा माझ्यासाठी एक विशेष सन्मान आहे, आणि आतापर्यंतच्या शिकवणुकीचा अनुभव खूपच उत्कृष्ट राहिला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत मी अगदी नवखा आणि अनुभवहीन होतो. मात्र, श्री. नीरज बोरगावकर यांनी त्यांच्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनद्वारे दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रत्येक शनिवारी त्यांच्या लाईव्ह चॅनलवरून मिळालेल्या ज्ञानामुळे माझा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. मी आता छोट्या-छोट्या पावलांनी ट्रेडिंग सुरू केली आहे. श्री. नीरज बोरगावकर आणि गुंतवणूक कट्ट्याचे मनःपूर्वक आभार!
Kamlakar Salgaonkar
गुंतवणूक कट्ट्याचा मी 2020 पासून सभासद आहे. शेअर मार्केटमध्ये सहजतेने काम करता यावे म्हणुन ग़ुंतवणूक कट्टा म्हणजे मराठी माणसाने मराठी लोकांसाठी केलेली गुरुकिल्ली म्हणता येईल. श्री. नीरज बोरगांवकर आणि त्यांच्या टीमने PBP मेंबरसाठी तयार केलेला कोर्स, ज्यांनी पूर्ण केला तर त्यांना इतरत्र कुठेही परत प्रशिक्षण घेण्याची गरज लागणारच नाही, असे माझे प्रामाणीक मत आहे. त्यांनी केलेले विवीध इंडीकेटर हे म्हणजे "सोने पे सुहागा" म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणुन म्हणतो '' साथी हाथ बढाना".
Vinay Dhumal
गुंतवणूक कट्टा हा शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्व मराठी माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॅटफॉर्म आहे. नीरज सर यांचे मार्गदर्शन अत्यंत मला खूप उपयोगी ठरले. विशेषतः शेअरमार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण, रिस्क मॅनेजमेंट, टेकनिकल आणि फंडामेंटल ऍनालिसीस याविषयीं मार्गदर्शन तर फारच अनमोल आहे. सर तुमच्यासारखा गुरु मिळणे हे माझे मोठे भाग्य आहे. तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
Samruddhi Gori
गुंतवणूक कट्टा हा एक चांगला उपक्रम आहे, यातुन सर तुम्ही शेअर मार्केट मधून नफा मिळवण्याचे ज्ञान आम्हाला दिले , मी जेव्हा 2018 मध्ये शेअर मार्केट मध्ये काम करण सुरू केल तेव्हा मला फारस काही येत नव्हत, तुम्हचे व्हिडिओ वारंवार बघुनच बरच काही जमायला लागल, तुमच telegram channel तर खुपच informative आहे त्यातीत अनुभवी मार्गदर्शन ,त्याचे अनुभव खुपच उपयुक्त आहे ..........शतशः धन्यवाद
Mukesh Gholap
Sir tumcha ha program mi lockdown la ghetla ahe tya madhe mala khup kahi shikayla milat ahe Ani tumcha shanivar cha program mala live bghta yet nahi Karan majh shop aslyane te rahun jaat tar tya baddal dilgiri vyakt krto Ani asach nav navin program amhala sangat Jaa Ani majhi ichha ahe ki apan mala ayushyat ekda tari bhetave 🙏🙏
Nahi tr aapla PBP group cha get-together thevave mhanje sarvanna sobat bheta yeyil Ani sarv prashnache samora samor uttar dekhil bhettil
From - Mukesh Gholap Nashik
Aishwary Garud
After conducting this course, I am very much on my own for deciding what to buy & when to buy. This course is very helpful to people who is willing to learn the stock market and earn the some money from the same. The course content is very much easy to understand. Mainly the Neeraj Sir's ability to teach the things in very easy & simple language is a plus point to this course. It is very good course for new learner & also for who is already working in stock market.
Nitin Gujarathi
I did not have any knowledge about share market prior to joining PBP.
I learnt a lot from Neeraj sir.
Nobody gives lifelong access to any materials these days, so Neeraj sir is a rarity.
Apart from that his live sessions give us an in-depth knowledge of the current market conditions and a hunger for how an investor should think and analyse market
The telegram group is like a family which i cherish.
Thank you PBP and Neeraj sir from the bottom of my heart.
Parashuram Kurhade
For those who do not know ...ABCD....of stock/share market, they can get good knowledge and become expert in Share market. I had taken admission in Guntavanuk Katta after my retirement from Tata Motors. Advantage is besides using idle time, I am earning side by side by spending two to three hours daily. Ofcoarse, one must have to learn the course properly as directed by Mr. Neeraj Sir. Best Wishes to new comers. Do join the Guntavanul Katta.