इंट्राडे ट्रेडिंग - धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय!
भारतीय शेअर बाजार हा एक संधींचा समुद्र आहे असे नेहमी म्हणले जाते आणि ते खरेदेखील आहे. परंतु सर्वांनाच या संधींचा योग्य लाभ घेता येतोच असे नाही. या शेअर बाजारामध्ये असंख्य विचारप्रवाह आहेत. कोणी म्हणते की शेअर बाजारामध्ये फक्त लॉंग टर्म गुंतवणूक केली तरच पैसा बनतो. कोणी म्हणते की लॉंग टर्म गुंतवणुकीपेक्षा ट्रेडिंगमध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. कोणी म्हणते की शेअर बाजार हा निव्वळ जुगार आहे आणि या ठिकाणी येणारी व्यक्ती पुरती कंगाल होऊनच बाहेर पडते. ही सर्व व्यक्तीसापेक्ष मते आहेत.